माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्रातच्या राज्यपाल पदी वर्णी लागू शकते अशी माहिती समोर येत आहे. पुढील महिन्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यात सुमित्रा महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांची जागा रिक्त होणार असून त्यांच्या जागेवर सुमित्रा महाजन यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
सुमित्रा महाजन यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळून मध्ये झाला. पण त्यांचे कुटुंब काही वर्षांपूर्वी मुंबईत येऊन स्थायिक झाले. इंदूरचे अधिवक्त जयंत महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या इंदूरमध्येच स्थायिक झाल्या. महाराष्ट्राच्या या कन्येनं १९८९ ते २०१४ पर्यंत सलग आठ वेळा इंदूर मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. नुकत्याच झालेल्या २०१९ च्या निवडणुकीत मात्र पक्षाकडून त्यांना तिकीट देण्यात आले नाही.