Skip to content Skip to footer

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन जुलै महिन्यात…….

शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक लवकरच पूर्णत्वाला येणार आहे. येत्या जुलै महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबलेली प्रक्रिया आता एमएमआरडीए महिन्याभरात पूर्ण करणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. त्या नंतर प्रत्यक्ष जुलै महिन्यात बांधकामाला सुरवात होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली या विषयी बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, मनपा आयुक्त परदेशी, एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी उपस्थित होत्या.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईतील महापौर बंगल्यात अंडरग्राऊंड स्मारक बांधण्यात येणार आहे. हेरिटेज समितीने अंडरग्राऊंड स्मारक बांधण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तसेच दादर मध्ये असलेल्या जुन्या झाडाची कत्तल न करता हे स्मारक बांधण्यात येणार आहे. महापौर बंगल्याची २३०० sq. फुटाची जागा कमी पडत असती. नऊ हजार sq. फुटाच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभे राहणार आहे. बंगल्याच्या मागच्या आणि पुढच्या जागेचा सुद्धा स्मारकासाठी उपयोग होणार आहे.

बंगल्याच्या आतील खोल्या आणि दलना मध्ये बाळासाहेबांचे फोटो लावण्यात येणार आहे. तसेच स्मरणचित्रं, व्यगंचित्र सुद्धा लावण्यात येणार आहे. स्मारकात तयार करण्यात येणारी गॅलरी तथा हॉल हा अंडरग्राऊंड असणार आहे. सध्या महापौर बंगल्याला हेरिटेजचा दर्जा असल्यामुळे तिच्या मूळ रचनेत कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत असे सुद्धा सांगण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5