Skip to content Skip to footer

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावणार – खासदार राहुल शेवाळे

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी एक अनोखा संकल्प केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांना एकूण ४ लाख २४ हजार ९१३ मते मिळाली होती. मतांच्या या संख्या इतकेच वृक्ष येत्या ५ वर्षांत लावण्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठरविले आहे. ‘प्लांट अ होप’ (Plant a Hope) अशा नावाने पुढील पाच वर्षे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात मुंबईतील विविध सामाजिक संस्थांनाही सहभागी करून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी केली जाणार आहे.

येत्या १० जूनला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत या उपक्रमाची, खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते सुरुवात केली जाणार आहे. मुंबईतील विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या तसेच सामन्य नागरिक या सर्वांच्या माध्यमातून पाच वर्षांत हा उपक्रम राबविला जाणार आहे. पुढे बोलताना शेवाळे म्हणाले की, “माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून मला मत देणाऱ्या प्रत्येक मतदारा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी मला मिळालेल्या मतांइतक्या वृक्षांची लागवड करणार आहे. जागतिक हवामान बदलाच्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. ‘प्लांट अ होप’ या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी राहील, अशी आशा करतो” असे उद्गार सुद्धा शेवाळे यांनी बोलून दाखविले.

4 Comments

  • gamble
    Posted October 31, 2019 at 12:02 am

    It’s an amazing post in favor of all the online users; they will obtain benefit from it I am sure.

  • Nancy Fortier
    Posted January 15, 2020 at 5:57 pm

    Thanks for writing this awesome article. I’m a long time
    reader but I’ve never been compelled to leave
    a comment. I subscribed to your blog and shared this on my Facebook.
    Thanks again for a great article! https://bmserviceexclusif.com

  • Trisha
    Posted January 17, 2020 at 2:04 am

    I couldn?t refrain from commenting. Perfectly written! http://www.osteopathie-canada.ca

  • Katie
    Posted January 23, 2020 at 11:59 am

    I enjoy what you guys are up too. https://cavm-ombc.ca

Leave a comment

0.0/5