Skip to content Skip to footer

विधानसभेच्या जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरे म्हणतात ‘आमचं ठरलंय…’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे लोकसभा विजयानंतर आता विविध मंदिरांना भेटी देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यापूर्वी त्यांनी आपली कुलदैवता एकवीरा देवीचे दर्शन घेतले होते. आता त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन आपल्या नवनिर्वाचित खासदारांसोबत घेतले. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभेतील युतीच्या जागा वाटपाबाबत वक्तव्य केले. यावेळी भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटीलही उपस्थित होते. ते म्हणाले, विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात आमचा निर्णय झाला आहे. आमचं या बाबत ठरलं आहे.

यावर पत्रकारांनी पुन्हा त्यांना या संदर्भात प्रश्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु, उद्धव ठाकरे म्हणाले, युतीबाबत आमचं ठरलंय ते अजून तुम्हाला सांगितलं नाही. योग्य वेळ आली की तुम्हांला सांगू. युतीच्या जागावाटपाबाबत कोणतीही नाराजी नाही. आमचं ठरलंय, आमच्यात युती होऊ नये, किंवा ही युती टीकू नये असे काहींना वाटतं आहे. त्यांच्या दुःखात मी सामील आहे. पण आमचे युतीचे जागा वाटप निश्चित झाले आहे. त्यामुळे येणारी विधानसभा शिवसेना-भाजपा एकत्र लढणार हे आता निश्चित झालेले आहे.

Leave a comment

0.0/5