Skip to content Skip to footer

अशोक चव्हाण यांचे उजवे-डावे सुद्धा राहणार नाहीत – गिरीश महाजन

आमच्या संपर्कात कोण आहेत याची यादी मी अशोक चव्हाणांना सांगितली तर त्यांचे उजवे-डावेही त्यांच्यासोबत राहणार नाहीत. त्यांच्यासोबत रात्रंदिवस फिरणारे आम्हाला घ्या म्हणून फोन करत आहेत. असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावर ते बोलत होते. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपा-काँग्रेस पक्षात आणखी वाद पेटण्याचे चिन्ह दिसून आहे

अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडा-फोडीचं राजकारण करतात, ते कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करत असतात असा आरोप केला होता, दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना चव्हाण यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. लोक फोडण्याचे काम नाही, पण जे लोक आमच्याकडे येत आहेत, त्यांना घेण्याचे काम आम्ही करतोय. आमच्या संपर्कात कोण आहेत याची यादी मी अशोक चव्हाणांना सांगितली तर त्यांचे उजवे-डावेही त्यांच्यासोबत राहणार नाहीत.

पुढे महाजन यांनी बोलून दाखविले की, इतकेच नव्हे तर, त्यांच्यासोबत रात्रंदिवस फिरणारे आम्हाला घ्या म्हणून फोन करत आहेत. त्यांची नावं आता मी उघड करणार नाही, पण ‘त्यांची’ अशी २५ जणं आमच्या संपर्कात आहेत असा दावाही त्यांनी केला. याचबरोबर, आचारसंहितेला फक्त तीन महिने आहेत. वेळ कमी आहे. ही २० – २० ची मॅच आहे. पुढचा काळ आमचाच आहे. असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

Leave a comment

0.0/5