Skip to content Skip to footer

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर भाजपाच्या वाटेवर ?

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने शिवसेना खासदार अडसूळ यांचा पराभव करून नवनीत राणा-कौर या विजयी झाल्या होत्या. परंतु काही दिवसापूर्वी “जय श्री राम” च्या मुद्धावरून त्यांना संसदेत सर्व खासदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आलेल्या आहेत. निमित्त असे की, खासदार कौर यांनी दोनच दिवसापूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाहा यांची भेट घेतलेली होता. त्यामुळे त्या राष्ट्रवादीला सोडचट्टी देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त साध्य सगळीकडे झळकत आहे.

खासदार नवनीत राणा यांच्याशी संपर्क साधला असता अमरावतीतील विकासकामांच्या मुद्यावर अमित शहा यांची भेट घेतल्याचे त्यांनीबोलून दाखविले. मात्र, त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी एका वृत्तसंस्थेला ‘बदल होत असतात’ अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यामुळे या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना नवनीत राणा व रवी राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणारे ठरू शकेल. महाराष्ट्रात काँग्रेसचा एक, तर राष्ट्रवादीचे चार खासदार आहेत. राणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विरोधी पक्षाची ताकद कमी होईल.

Leave a comment

0.0/5