Skip to content Skip to footer

प्लॅस्टिकबंदी प्रभावीपणे राबवावी – मनीषा कायंदे

मुसळधार पावसात प्लॅस्टिकच्या कचऱयामुळे मुंबईतील नाले तुंबले आहेत. तिथे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली. मुंबईतील 22 टेकडय़ांवर लोक घरे बांधून राहत आहेत. टेकडय़ांवरील वस्ती कमी केली पाहिजे, तिथल्या नागरिकांना अन्यत्र हलवले पाहिजे, अशी मागणी कायंदे यांनी केली. प्लास्टिक बंदी बद्दल शिवसेना पक्षाने अनेकवेळा आवाज उठवला आहे. तसेच खुद्द युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतूनच राज्यात प्लास्टिक बंदी ही प्रभावीपणे राबवली जात आहे.

प्लास्टिक बंदी संदर्भात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्लॉस्टिक बंदी बद्दल सविस्तर चर्चा सुद्धा केली होती.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. आज मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकणी पाणी तुंबलेले दिसून येत होते.

याला कारणीभूत फक्त आपण रोजच्या वापरात असलेल्या प्लास्टिकमुळेच हा प्रश्न मुंबईसह राज्यात निर्माण झालेला दिसून येत आहे. व वेळीच आपण जर योग्य ती दखल घेतली नाही तर याचे दुष्परिणाम आपल्यासकट येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा भोगावे लागतील. म्हणूनच प्लास्टिक बंदी संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे असे मत शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी मांडलेले आहे.

Leave a comment

0.0/5