Skip to content Skip to footer

काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे,अशोक गेहलोत यांच्या नावाला विरोध.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीची संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी पक्षातील जेष्ठ नेते माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे किंवा अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा सध्या काँग्रेस पक्षात चालू झाली होती. परंतु आता काँग्रेस पक्षातील काही नेते मंडळीनी या दोन्ही नावाला आपला विरोध दर्शवली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी तरूण नेतृत्वाची निवड करावी असे मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग यांचा सुशीलकुमार शिंदे, अशोक गेहलोत यांच्या नावांना विरोध आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

तर दुसरीकडे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता काँग्रेसने कमजोर अध्यक्ष न देता खंबीर अध्यक्ष द्यावा. त्यामुळे भाजप, आरएसएसशी लढण्याची हिंमत मिळेल असे ट्वीट केले होते. आचार्य प्रमोद कृष्णम हे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे लखनऊमधील उमेदवार होते.

त्यासाठी काँग्रेसनं बैठकीचं आयोजन करावे, असे देखील त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटल्यानं मोठा वाद झाला होता. प्रियंका गांधी या काँग्रेस अध्यक्षपदासाठी सक्षम आहेत. त्या गांधी परिवारातून देखील आहेत. त्यामुळे त्यांना अध्यक्ष करा अशी मागणी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली होती.

Leave a comment

0.0/5