Skip to content Skip to footer

भजपा मध्ये इच्छूक असणारे आमदार आपला राजीनामा देऊन भाजपा मध्ये सामील होतील – चंद्रकांत पाटील

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. ‘राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून लवकरच ते राजीनामे देऊन भाजपमध्ये दाखल होतील,’ असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

सोलापुरात बोलताना ते म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश करण्यास राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात आहेत. योग्य वेळ आल्यानंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तत्पूर्वी असे इच्छुक आमदार आपले राजीनामे सादर करतील, नंतर त्यांना भाजपात घेतले जाईल. राजीनामे सादर करणाऱ्या आमदारांची नावे लवकरच पुढे येतील, असेही ते म्हणाले.

Leave a comment

0.0/5