Skip to content Skip to footer

कुलभूषण जाधव यांना सुखरुप आणणे हाच सरकाराचा खरा पुरुषार्थ ठरेल-उद्धव ठाकरे

हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला तुर्तास स्थगिती दिली आहे. त्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलं आहे.

भारतीय सैन्यदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुखरुप सुटका झाली हा आनंद आहे. मात्र कुलभूषण जाधव यांना सुखरुप मायदेशात आणणं हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मोदी आणि शहांनी मनात आणलं तर काय अशक्य आहे? जाधव यांच्या सुटकेसाठी बळाचा वापर करावा लागेल. इतकंच आम्ही सांगू शकतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यादरम्यान भारतीय अभिनंदन हे पाकिस्तानच्या हाती सापडले. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावांचा परिणाम आणि मोदी सरकाच्या भीतीमुळे अभिनंदन यांना मुक्त केलं. मग ते भाग्य कुलभूषण यांच्या कुटुंबाला का मिळू नये?, असा सवालही त्यांनी सामनामधून विचारला आहे. कुलभूषण जाधव जेव्हा भारतात परत येतील तो दिवस विजयाचा असेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Leave a comment

0.0/5