Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरेंनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरांताना लगावला टोला

माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. मात्र काही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहिती नाही. असे म्हणत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. बाळासाहेब थोरातांनी जन आशीर्वाद यात्रेवर मिश्किल टीका करत आदित्य ठाकरे हे महाविद्यालयीन वयाचे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा नगरला आली असताना त्यांनी शिवसेना स्टाईलने प्रतिउत्तर दिले

 

 

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या त्र्यंबकेश्वर येथील “जन आशीर्वाद” दौऱ्यातील ठळक मुद्दे

यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री कोण होणार यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मुख्यमंत्री कोण होईल हे माहित नाही. मात्र, संपूर्ण महाराष्ट्र भगवा होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री कोणाला बनवायचं यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढलेली नाही.’

तर शेतकरी, धनगर, विद्यार्थी, महिला यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. आम्ही निवडणुकीच्या आधी युती करतांना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची पहिली अट ठेवल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

2 Comments

  • गणेश हौशीराम जाधव
    Posted July 23, 2019 at 10:12 am

    शिवसेना ही सर्व सामान्य जनतेच्या कामी येनारी हाकेला धावनारी आहे म्हनुन आदित्य साहेबांची जनतेची आशिवार्द यात्रा चागली पार पडत आहे म्हनुन जनता कायम आदित्य साहेबाच्या पाठीशी उभी राहिल व हा महाराष्ट्र भगवा मय केल्याशिवाय राहनार नाही जयहिंद जय महाराष्ट्र

Leave a comment

0.0/5