Skip to content Skip to footer

राष्ट्रवादी सध्या राम भरोसे ?

लोकसभा निवडणुकीनंतर इतर पक्ष राज्यात विधानसभेची तयारी करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष संपण्याच्या मार्गावर दिसत आहे. सध्या अशीच चर्चा राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका महिन्यातच राष्ट्रवादी पक्षाचे बीड जिल्ह्याचे मतबल नेते समजले जाणारे जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या कुटीर राजकारणाला कंटाळून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. आता त्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला कायमचा राम-राम ठोकला आहे. तर राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष सचिन अहिरे यांनी सुद्धा शिवसेना पक्षात प्रवेश करत पवारांना धक्काच दिला होता.

आज झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे जुने आणि वरिष्ठ नेते मधुकर पिचड तथा नवी मुंबईचे आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. एकेकाळी इतर पक्षतील नेते फोडून स्थापन झालेली पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा संपुष्ठात येण्याच्या मार्गावर दिसून येत आहे.

सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची परिस्थिती सारखीच असताना दिसत आहे. आज राष्ट्रवादीकडे येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी चांगले उमेदवार सुद्धा शिल्लक राहिलेले नाही आहे. त्यामुळे येणारी निवडणूक राष्ट्रवादी राम भरोसे लढणार असेच चित्र महाराष्ट्रात दिसून येणार आहे.

Leave a comment

0.0/5