Skip to content Skip to footer

सोलापुरात आदित्य इन ऍक्शन:विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडवल्या

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरु झाला. सोलापूर शहरातील वालचंद महाविद्यालयात झालेल्या आदित्य संवाद कार्यक्रमापासून या दौऱ्याची सुरुवात झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या समस्या जागच्या जागी सोडवल्या. सोलापूर शहरात कष्टकरी कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय आसपासच्या खेडेगावातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. शहरात मोठ्या प्रमाणावर नॅशनल खेळाडू आहेत. आजवर कोणताच नेत्याने अशाप्रकारे संवाद साधत येथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या नव्हत्या. त्यामुळे या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रश्न मांडताना विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह आणि अपेक्षा दिसून आल्या. आदित्य ठाकरेंनीही तात्काळ विद्यार्थ्यांसाठी मोफत बस, खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. या संवादादरम्यान मांडले गेलेले प्रश्न आणि आदित्य ठाकरेंची त्यावरील ऍक्शन थोडक्यात:

प्रश्न: आम्ही २५ किमीवरून खेडेगावातून शिक्षणासाठी शहरात येतो. आम्हाला यायला बस नाही. त्यामुळे त्रास होतो आणि उशीर होतो.
ऍक्शन: सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठान कडून मुंबईत मोफत बस सुरु करण्यात आल्या आहेत. अशीच एक बस आदित्य ठाकरे सोलापुरात सुरु करणार आहेत.
प्रश्न: सोलापुरातील कुमठा नाका येथील क्रीडा संकुल रखडलेलं आहे. खेळाडूंना सुविधा नाहीत महापौर चषक गेली १० वर्षे बंद आहे. आपण यासाठी काय पुढाकार घ्याल?
ऍक्शन: खेळाडूंना सुविधा देण्यासाठी शक्य ते केलं जाईल. कुमठा नाका क्रीडा संकुलास जाता-जाता मी स्वतः भेट देईन.
प्रश्न: सोलापुरात नोकऱ्या नाहीत. आयटी इंडस्ट्री नाही. सोलापुरात कंपन्या येतील यासाठी काय करता येईल?
ऍक्शन: सोलापुरात काहीच कमी नाही. टॅलेंट भरपूर आहे. मी याच वर्षीपासून कंपन्यांना सोलापूर काय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करेन.
प्रश्न: सोलापुरात हॅण्डबॉल मैदानं कमी आहेत. मुलं-मुलींना प्रॅक्टिस करण्यासाठी एकच मैदान आहे. मुलींना कपडे बदलासाठी जागा नाही. आहे तेही मैदान खराब आहे. यापूर्वी आम्ही एका पक्षाकडे गेलो होतो. त्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं. निवडणूक संपली आणि त्यांचं आश्वासन तसंच राहिलं.
ऍक्शन: मी निवणुकीसाठी बोलणार नाही, पण मंत्री तानाजी सावंतांना सांगतो की येत्या पंधरा दिवसात इथे मदत करा आणि काम पूर्ण झालं की मला मेसेज करा. मला खात्री आहे की ते हे काम १००% करतील.
प्रश्न: मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यासाठी अभियान राबवलं जातं, तसं मुलांना सभ्यतेचे धडे देण्यासाठी का राबवलं जात नाही?
ऍक्शन: मी केंद्र सरकारकडे अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश व्हावा यासाठी याआधीच सूचना मांडलेली आहे.

 

Leave a comment

0.0/5