Skip to content Skip to footer

विधानसभेच्या ३० जागा फक्त जिंकून दाखवा, ममता बॅनर्जींचे भाजपाला आवाहन

विधानसभेच्या ३० जागा फक्त जिंकून दाखवा, ममता बॅनर्जींचे भाजपाला आवाहन

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात भारतीय जनता पक्षाने तृणमूलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये रोड शो करत ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसला आवाहन दिले होते.

त्यात पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बीरभूम जिल्ह्यात पदयात्रा काढली होती. यानंतर त्यांनी एका सभेत बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता. भाजपाने बंगालमध्ये ३० जाग जिंकून दाखवाव्यात, असे त्यांनी आवाहन दिले आहे.

भाजपाने २९४ जागांचे स्वप्न नंतर पाहावे, अगोदर ३० जागाच जिंकून दाखव्यावत” असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. याशिवाय भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या दौऱ्यांवरूनही त्यांनी यावेळी निशाणा साधला. भाजपा नेते दर आठवड्याला येतात पंचातारांकित हॉटेलमध्ये जेवण करतात. मात्र दाखवतात असे की जसे आदिवासीच्या घरी जेवण करत असल्याचे त्यांनी म्हटत नाव न घेता गृहमंत्री अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर हल्ला चढवला होता.

Leave a comment

0.0/5