Skip to content Skip to footer

इतर कोणीही मला माझा वारसा सांगू नये – शिवेंद्रराजें भोसले

विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी काल भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशात राष्ट्रवादीचे मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव वैभव पिचड आणि साताऱ्याचे राजे शिवेंद्रराजे भोसले यांचा सुद्धा समावेश होता.

या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजेंवर जोरदार टीका केली होती. आव्हाड म्हणाले, ‘शिवेंद्रराजे ज्या राजेंचा वारसा सांगतात त्या शिवाजीराजेंनी केवळ १६ मावळ्यांना घेऊन तोरणा जिंकला होता’ असे म्हणत शिवेंद्रराजेंवर चांगलाच निशाणा साधला. तसेच पुढे बोलताना, शिवेंद्रराजे हे शिवरायांचे वारसदार नसून राजेंचे खरेच वारसदार आम्ही आहोत, असे आव्हाड म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर आव्हाडांच्या या टीकेवर शिवेंद्रराजें भोसले यांनी चांगलेचं प्रत्युत्तर दिले आहे. शिवेंद्रराजें म्हणाले की, जितेंद्र आव्हाड किंवा इतर कोणीही मला माझा वारसा सांगू नये. मला माझा वारसा पूर्ण माहीत आहे. असे म्हणत शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. येन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते पक्षाचा राजीनामा देत असल्यामुळे सध्या राष्ट्रवादी पक्ष खिळ-खिळा झालेला दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5