Skip to content Skip to footer

स्पेशल रिपोर्ट:युवतींना वाटतोय आदित्य ठाकरेंचा आधार

नेत्यांचे दौरे, सभा, कार्यक्रम असले की सहसा पुरुषांची आणि तरुणांची गर्दी पाहायला मिळते. अशा कार्यक्रमात महिला आणि तरुणींचा सहभाग तुरळक प्रमाणात असतो. सहभाग असला तरी तो केवळ नावापुरताच ठरतो. त्यातही राजकारण म्हटलं की महाविद्यालयीन युवती आणि सामान्य महिला त्यापासून चार पावलं लांबच राहणं पसंत करतात. मात्र युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत महिला आणि युवतींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचं दिसून येत आहे.

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थिनी, युवती, महिला यांची नुसती हजेरीच नाही, तर सक्रिय सहभाग आहे. “आदित्य संवाद” मध्ये तर युवकांपेक्षा युवतींचाच जास्त सहभाग दिसून येतो. प्रश्न विचारतानाही महाविद्यालयीन तरुणीच जास्त दिसतात. यामागे एक महत्वाचं कारण आहे ते युवतींना आदित्य ठाकरेंचा वाटणारा आधार. गेल्या काही वर्षात आदित्य ठाकरे यांनी महिला आणि युवतींच्या अडचणी, त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यावर उत्तम काम केलं आहे. ज्या वयात मुलं तारुण्य एन्जॉय करताना दिसतात त्या वयात आदित्य ठाकरे युवतींचा भाऊ बनून त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्याचीच ही पावती म्हणायला हवी. याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशात महिला आणि युवतींवर होणारे अत्याचार हा अत्यंत महत्वाचा सामाजिक प्रश्न आहे. यावर उपाय म्हणून आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून मुंबईतील २५००० विद्यार्थिनींना मोफत आत्मसंरक्षणाचे धडे दिले आहेत. शिवाय महाराष्ट्रभर आत्मसंरक्षण शिबिरं घेतली आहेत. आदित्य ठाकरे हे कार्यक्रम नुसतेच आयोजित करत नाहीत तर कार्यक्रमाला ते जातीने उपस्थित असतात.

ऍक्शन AUT

मुंबई महापालिका शाळांमध्ये विद्यार्थिनीसाठी सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन्स बसवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता.

महिलांना स्वयंरोजगार म्हणून गुलाबी रिक्षावाटप, रिक्षा परवाने मिळवून देणं यासाठी आदित्य ठाकरे यांनी काम केलं आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आदित्य ठाकरे हे प्रयत्नशील आहेत. मुलांना सभ्यतेचे धडे अभ्यासक्रमातच देण्यात यावेत असा आग्रह त्यांनी केंद्र सरकारकडे धरला आहे.

महिलांना अत्याचाराचे प्रमाण वाढलेले असल्याने असुरक्षित वाटतं. शिवाय एखादी घटना घडल्यास दोष आधी मुलींनाच दिला जातो. याविषयी आदित्य ठाकरे महिलांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. महिलांना कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी जाताना सुरक्षित वाटलंच पाहिजे असं आदित्य ठाकरे यांचं ठाम मत आहे.

सुंदर उद्यान आजीबाईंनी

आदित्य संवाद कार्यक्रमात युवतींनी मांडलेले प्रश्न आदित्य ठाकरे यांनी जागेवर सोडवले आहेत. नगरमधील महाविद्यालय परिसरातील कचऱ्याचा प्रश्न, सोलापुरातील विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये येण्यासाठी मोफत बसची सोय करणं अशी अनेक कामं त्यांनी झटक्यात केल्याची उदाहरणं आहेत.

महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना आरोप सिद्ध होताच तात्काळ फाशीची शिक्षा दिली जावी यासाठी आदित्य ठाकरे आग्रही आहेत.

सोलापुरातील आदित्य संवाद कार्यक्रमात “गाय जेवढी महत्वाची तेवढीच माय महत्वाची आहे, महिलांना हात लावणाऱ्याचे हात-पाय भरचौकात छाटले पाहिजेत असं माझं मत आहे” असं म्हणत उपस्थितांची मनं जिंकली आहेत.


वरील सर्व कामे महिलांसाठी आणि युवतींसाठी करणारा दुसरा आश्वासक चेहरा सध्या नाही. आदित्य ठाकरे नुसतेच बोलत नाहीत तर हाती घेतलेलं काम पूर्ण करतात. त्यामुळे त्यांनी युवती आणि महिलांचा विश्वास संपादित केला आहे. यामुळेच आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात युवती व महिलांची मोठी गर्दी आणि उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो. ही गर्दी अगदी १५ ते ८५ वयोगटातील सर्वच महिलांची असते. यावरून महिलांना आदित्य ठाकरेंचा आधार वाटत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Leave a comment

0.0/5