Skip to content Skip to footer

ईव्हीएमवर शंका सोडा, जनतेमध्ये जा – देवेंद्र फडणवीस

महाजनादेश यात्रेसाठी निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा आणि कार्यक्रम घेत भाजप सरकारनं केलेल्या कामगिरीविषयी सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एका अर्थाने ही प्रचारयात्राच झाल्याचं ऐकायला मिळत असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इव्हीएमवर टीका करणाऱ्या विरोधकांवर टीका केली आहे. शुक्रवारी वर्ध्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विरोधकांना इव्हीएम सोडून जनतेमध्ये जायचा सल्ला दिला आहे. तसेच, ‘विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. इव्हीएमवर शंका म्हणजे जनतेविषयी अविश्वास’, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी इव्हीएमविषयी टीका करणाऱ्या विरोधकांवर टीका केली आहे. ‘अनेकदा सत्य स्वीकारण्याऐवजी मनाला समजावण्याचा प्रयत्न लोकं करतात आणि असत्याची कास धरतात. इव्हीएम काही आत्ता नाही आलंय. या १० वर्षांमध्ये इव्हीएमचा वापर सगळीकडे झाला आहे.

इव्हीएमवर आंदोलन करण्याऐवजी ते (विरोधक) जर जनतेमध्ये जाऊन म्हणाले की आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही, भविष्यात करू असं जरी म्हणाले, तरी त्यातून त्यांना सहानुभूती मिळेल’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

2 Comments

  • अमोल एकनाथ राऊत
    Posted August 2, 2019 at 2:59 pm

    प्रश्न एक आहे

Leave a comment

0.0/5