शिवसेना नेते तथा पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याच्या दुसऱ्या टप्यात आदित्य ठाकरे बीड जिल्यात आले होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी नव महाराष्ट्र घडविण्याचा दृष्टीकोन समोर ठेऊन विकास कामे केली जात आहेत असे बोलून दाखविले होते. शिवसेनेत जयदत्त क्षीरसागरांवर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी दिली आहे.
जे नेते सक्षमपणे काम करु शकतील अशाच स्किलबेस्ड नेत्यांची शिवसेनेत भरती केली जात असल्याचे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले असे सांगून कुशल नगराध्यक्षांच्या दिर्घकालीन संकल्पनांची कामे बीडमध्ये होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या कामांचे कौतुक केले. बीड नगर पालिकेने पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करत भुमिगत गटार योजनांचे काम हाती घेतले आहे. त्यांचे काम हे पुढील पन्नास वर्षाच्या दृष्टीकोनातून सुरु असल्याचे आदित्य ठाकरे असे म्हणाले. तसेच सेनेमध्ये स्किलबेस्ड नेत्यांची भरती केली जात असल्याचे सांगत एक प्रकारे क्षीरसागर बंधूंच्या कामाची पावतीच दिली