Skip to content Skip to footer

काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन आमदार आणि एक माजी आमदार लवकरच शिवसेनेत

काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन आमदार आणि एक माजी आमदार लवकरच शिवसेनेत?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबत नाहीये. अनेक नेते आणि आमदार शिवसेना-भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीला शिवसेनेकडून जबरदस्त धक्का बसण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीतून दोन आमदार आणि एक माजी आमदार लवकरच शिवसेनेत दाखल होणार असल्याची बातमी आहे. यात बार्शीचे राष्ट्रवादी आमदार दिलीप सोपल, काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदार रश्मी बागल यांच्या समावेश आहे. हे नेते त्यांच्या मतदारसंघातील प्रस्थापित नेते आहेत. त्यामुळे शिवसेनेला येत्या विधानसभा निवडणुकीत याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढू शकते.

कोण आहेत रश्मी बागल?

-सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तरुण तडफदार नेत्या
-करमाळ्याच्या माजी आमदार
-दिग्गज नेते दिगंबरराव बागल यांच्या कन्या
-कार्यकर्त्यांची मोठी फौज
-अनेक संस्था आणि कारखान्यांवर बागल गटाचं वर्चस्व आहे
-करमाळा परिसरात बागल कुटुंब हे प्रतिष्ठित कुटुंब आहे
-राजकीय आणि सहकारी वर्चस्व असलेलं हे घराणं आहे

कोण आहेत दिलीप सोपल?
-माजी मंत्री
-सोलापुरचे माजी पालकमंत्री
-बार्शी परिसरातील दिग्गज नेते
-१९८५ ते २००४ काळात सलग पाचवेळा आमदार
-राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार
-अजित पवारांचे निकटवर्तीय

कोण आहेत निर्मला गावित?
-इगतपुरीच्या विद्यमान काँग्रेस आमदार
-नऊ वेळा खासदार आणि दोनवेळा राज्यमंत्रीपद भूषविलेल्या माणिकराव गावित यांच्या कन्या
-इंदिरा गांधींच्या काळापासून गावित घराणं काँग्रेससोबत राहिलं आहे
-आदिवासी भागातील दिग्गज नेतृत्व असलेलं घराणं

शिवसेनेच्या वैद्यकीय पथकाकडून २ दिवसात १५ हजार पुरग्रस्तांवर औषधोपचार

Leave a comment

0.0/5