Skip to content Skip to footer

वंचित आणि एमआयएम पक्षात जागा वाटपावरून मतभेद…..

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाणार का ? यावर चर्चासत्र सुरु असताना आता त्यांचा मित्रपक्ष एमआयएम देखील सोबत लढेल का ? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले आहे. निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयचे नेते अबुद्दीन ओवेसी यांच्यात जागावाटपावरून दोन मते झाल्याचे समोर येत आहे. कारण एमआयएमला फक्त आठ जागा देण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने दाखवल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीने भल्याभल्यांना घाम फोडला होता. इतकेच नाही तर संभाजी नगर लोकसभा मतदार संघातून एक खासदारसुद्धा त्यांना मिळाला, या आघाडीने राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची धुळधाण उडवली, मात्र हीच आघाडी आता तुटल्यात जमा आहे, कारण एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीला १०० जागांची मागणी केली होती, त्यानंतर ही मागणी ७५ वर आली त्यानंतर अगदी ५० वरही एमआयएम तयार झाली, मात्र आंबेडकरांनी या सगळ्यांच मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे.

Leave a comment

0.0/5