Skip to content Skip to footer

पवार घराण्याने केला विश्वासघात – हर्षवर्धन पाटील

काँग्रेसचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या तिघांनी इंदापूर तालुक्यात नेहमीच विश्वासघाताचे राजकारण केले आहे असा आरोप पाटील यांनी लगावला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० सप्टेंबर रोजी दुसऱ्या पक्षातील प्रवेशाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल असे सुद्धा सूचक विधान केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील आणखी एक बडा नेता पवारांच्या धूर्त राजकारणामुळे पक्षाला सोडचिट्टी देणार हे आता निश्चित झालेले आहे.

विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा काँग्रेस पक्षाला म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना सोडण्यासाठी राष्ट्रवादी तयार नसल्यमुळे जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी इंदापूरातील बाजार समितीच्या आवारात इंदापूरकरांची मते जाणून घेण्यासाठी हर्षवर्धन पाटलांनी बैठक आयोजित केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या बारामतीच्या लबाड व फसव्या शेजाऱ्यांना जसाच तसे उत्तर देण्याचे ठरलेले आहे. राष्ट्रवादी विरोधात पाटील यांनी बंडच पुकारले आहे.

सुप्रिया सुळे यांच्या “निरमा पावडर”च्या प्रश्नाला दानवेंचे चोख प्रातिउत्तर….

२० वर्ष राजकारणात मी बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख ही शब्द पाळणारी माणसे पहिली. आता मी राजकारणात शब्द न पाळणारी माणसे पाहत आहे असे उदगार काढून नाव न घेता शरद पवारांकडे बोट दाखविले आहे. या घडलेल्या सर्व घडामोडीमुळे इंदापूर मतदार संघातील विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार असाच सामना पाहायला मिळणार आहे.

Leave a comment

0.0/5