Skip to content Skip to footer

“पवार साहेब तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही” नेटकऱ्यांचा सवाल…..

शिखर बँक घोटाळ्यात ‘ईडी’ ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या विरोधात ‘मनी लाँड्रिंग केस’ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. शरद पवारांव्यतिरिक्त माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांच्या विरोधातसुद्धा गुन्हा दाखल केला गेला आहे.शरद पवार ह्यांच्या विरोधात नोंदवला गेलेला गुन्हा हा राजकिय सूडबुद्धीने केल्या गेला आहे अशी ओरड राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून होतांना दिसतें आहे.

शरद पवारांच्या होणाऱ्या चौकशी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती बंदची हाक दिली आहे.या कारवाई विरोधात विचारले असता, शरद पवारांनी त्यांच्या विरोधात होत असलेल्या चौकशीचा संबंध थेट महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडण्याचा प्रयत्न केला. “महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या तख्तापूढे झुकणारा नाही” असे भावनिक वक्तव्य पवारांनी केले.

ईडी कार्यालयात आज शरद पवार हजर राहणार…..

मात्र नेटकाऱ्यांनी शरद पवारांच्या ह्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला, “पवार साहेब तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही” अशा शब्दात नेटकाऱ्यांनी पवारांना टोला हाणला आहे. ‘स्वतःला संपूर्ण महाराष्ट्र समजणारे पवार साहेब सोनिया गांधींपुढे झुकतात तेव्हा त्यांना महाराष्ट्राची आठवण येते की नाही’? असे प्रश्न विचारत नेटकाऱ्यांनी शरद पवारांना चांगलेच फैलावर घेतले.

Leave a comment

0.0/5