Skip to content Skip to footer

भाजपाच्या नितेश राणे विरोधात शिवसेनेचे सावंत……

भाजपाच्या नितेश राणे विरोधात शिवसेनेचे सावंत……
कणकवलीत राजकीय धुमशान सुरु झालेली पाहायला मिळत आहे. नारायण राणे आणि त्यांच्या मुलाच्या उमेदवारीला शिवसेना पक्षाचा पहिल्यापासून विरोध होता. भाजपाने आयत्यावेळी निलेश राणे यांना AB फॉर्म देऊन राणे यांना उमेदवारी देताच शिवसेनेनेही राणे विरोधाची धार अधिकच तीव्र करून राणेचे एकेकाळचे सहकारी सतीश सावंत यांना उमेदवारी दिलेली आहे. सावंत यांनी प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
काल कणकवलीत भाजपा कार्यलयात जाऊन नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला. आणि भाजपाने त्यांना AB फॉर्म सुद्धा दिला. नितेश राणे यांच्या कार्य पद्धतीला कंटाळून सतीश सावंत यांनी राणेंची साथ सोडली होती. सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहे. तसेच सलग तीन वेळा जिल्हा परिषदेची निवडणूक ते जिंकत आलेले आहे. निलेश राणे यांनी भाजपा कडून अर्ज दाखल करताच सावंत यांनी सुद्धा शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

Leave a comment

0.0/5