Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे सोबत उद्धव ठाकरेकडून अजून एका युवा नेत्याचे कौतुक……

आदित्य ठाकरे सोबत उद्धव ठाकरेकडून अजून एका युवा नेत्याचे कौतुक…….
यंदाची निवडणूक ठाकरे घराण्यासाठी महत्वाची निवडणूक आहे. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. निवडणुकीपासून कायम दूर राहणाऱ्या ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे वरळी मतदार संघातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे वरळी विधानसभा मतदार संघाकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सामना या मुखपत्रातून आदित्य ठाकरे यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. तसेच अजून एक युवा खासदारांचे सुद्धा कौतुक केले आहे.

वसेना पक्षातील युवाशक्तीवर बोलताना अजून एका तरुण आणि तडफदार खासदार ध्येयशील माने यांचे तोंड भरून कौतुक उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तुम्ही युवा शक्तीला कधी संधी देणार आहात? केवळ माझा मुलगा म्हणून बोलत नाही आहे. पण हातकणंगनेचा खासदार ध्येयशील माने यांचे उदाहरण घ्या. किती छान वाटतो, बोलतो चांगला तडफदार आहे. तरुण आहे अशा शब्दात खासदार माने यांची स्तुती केली. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव करून ध्येयशील माने खासदार म्हणून निवडून आले. तसेच संसदेत आपल्या प्रथम भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माने यांच्या भाषणाचे कौतुक केले होते.

Leave a comment

0.0/5