Skip to content Skip to footer

शिवसेनेचा जाहीरनामा गरिबांच्या हितासाठीच

पुन्हा शिवसेनेचा जाहीरनामा गरिबांच्या हितासाठीच
शिवसेनेचा विधानसभा निवडणूकपूर्व ‘वचननामा’ आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित झाला. या प्रकाशन सोहळ्याला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, प्रियांका चतुर्वेदी आदी शिवसेना नेते उपस्थित होते. आज जाहीर झालेल्या वचननाम्यात मुख्यतो गरीब जनतेच्या हिताचा विचार करूनच अनेक आश्वासन दिलेले आहे.

या वचननाम्यात आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणांमध्ये सांगितल्याप्रमाणे दहा रूपयात थाळी, एक रूपयात आरोग्य चाचणीच्या मुद्द्यासह शेतकरी, रस्ते, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आश्वासन दिली गेलीत. एकही वचन खोटं ठरणारं नाही, असे सांगितले. तसेच राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच वचननामा तयार केल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याच्या तिजोरीचा विचार करून हा वचननामा आम्ही बनवलेला आहे, पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा आखलेला आहे. यातले एकही वचन खोटं ठरणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. दुर्बल घटक शेतकऱ्यांना प्रतिवर्ष १० हजार रुपये देणार, हे सगळे करताना अत्यंत जबाबदारीने विचार केलेला असल्याचे उद्धव ठाकरेंनी पत्रकारांनी बोलताना सांगितलं.

हा वचननामा बनवताना ५ वर्षांचा आपला जो काही फिरण्याचा अनुभव, लोकांशी चर्चा आणि लाखो लोकांचे प्रश्न घेऊन जन आशीर्वाद यात्रेत आणि दुष्काळी दौऱ्यात लोकांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांचे एकत्रीकरण आणि संकलन करून वचननामा बनवलेला असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितले. आज देशाच्या विकास बरोबर जनतेचा विकास सुद्धा महत्वाचा सातो या सर्व गोष्टींचा विचार करूनच जाहीरनामा आखण्यात आलेला आहे.

हे ही वाचा :- शिवसेनेचा वचननामा जाहीर

शिवसेनेचा “वचननामा” जाहीर

Leave a comment

0.0/5