Skip to content Skip to footer

…पण काहींना पहिली दोन नावे घेताना अॅलर्जी, पवारांनी नाव न घेता लगावला विखे कुटुंबियांना टोला

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात राधाकृष्ण विखे कुटुंबाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “देशातील पहिला सहकारी साखर कारखाना नगरमधील प्रवरा कारखानाच आहे. त्याच्या उभारणीतील पहिली दोन नावं म्हणजे अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ आणि अण्णासाहेब शिंदे ही आहेत. पण नावं घेताना काहींना अॅलर्जी होते,” असा टोला पवारांनी लगावला.

विखे कुटुंबाकडून प्रवरा साखर कारखान्याचं श्रेय कायमच पद्मश्री विठ्ठलराव विखेंना देण्यात येते. मात्र, इतर नावांचा उल्लेख होत नाही, असाच पवारांचा हे बोलण्यामागील रोख असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार म्हणाले, “देशातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरचाच आहे. हा कारखाना उभा करण्यात पहिले दोन नावं म्हणजे धनंजय गाडगीळ आणि अण्णासाहेब शिंदे यांची आहेत. पण ही नाव घेताना अनेकांना अॅलर्जी होते.” असा टोला नाव न घेता विखे कुटुंबियांना लगावला होता.

Leave a comment

0.0/5