Skip to content Skip to footer

अजित पवारांच्या वक्तव्यामूळे भुजबळांच्या अडचणी वाढल्या

इडी विरोधातील आंदोलने शिखरावर पोहचलेले असताना अजित पवारांनी राजीनामा दयायला नको हवा होता असे मत राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केले आहे. राजीनामा दयायचे काय कारण होते, निदान राजीनामा दोन दिवसांनी तरी द्यायला हवा होता.

हे प्रकरण आणि अंदोलन शिखरावर पोहचलेले होते. निवडणुकीच्या दृष्टीने त्याला महत्व होते. अशा परिस्थितीत अजित पवारांनी असे करायला नको हवे होते. असं परखड मत भुजबळांनी मांडलेले आहे. हिंदूह्दयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेप्रकरणी जेव्हा प्रसार माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न विचारला होता.

त्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी नाव न घेता तो निर्णय भुजबळांचा होता अस सांगण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला होता. या मुलाखतीबाबत जेव्हा भुजबळांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षरित्या तोंडसुख घेतले. अजित पवारांनी सरळ सांगायला हवे होते मी त्यावेळी जुनिअर होते, हा प्रश्न माझ्यासाठी नाही. या प्रश्नाचे उत्तर भुजबळ देतील असे सांगायला हवे होते.

Leave a comment

0.0/5