Skip to content Skip to footer

शिवसेना प्रवक्त्यांच्या यादीत खासदार धैर्यशील माने यांचे नाव

शिवसेना प्रवक्त्यांच्या यादीत खासदार धैर्यशील माने यांचे नाव
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांना पराभवाची धूळ चाखत लाखोंच्या मताधिक्त्याने निवडून आलेले खासदार धैर्यशील माने यांच्या प्रभावी वक्तृत्व भाषा शैलीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार माने यांची शिवसेना पक्षाच्या अधिकृत प्रवक्तेपदी नियुक्ती केलेली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी प्रसार माध्यमांशी संवाद साधणाऱ्या प्रवक्त्यांच्या यादीत माने यांचे सुद्धा नाव आहे. या यादीत अरविंद सावंत, निलमताई गोरे, विशाखा राऊत, भावना गवळी, राहुल शेवाळे, धैर्यशील माने, अनिल परब, मनीषा कायंदे, सुनील शिंदे, सुरज चव्हाण, सचिन अहिर, वरून सरदेसाई, हेमराज शहा, साईनाथ दुर्गे, किशोर कान्हरे, शीतल म्हात्रे आणि सुभा राऊत तसेच काँग्रेस मधून शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या नावाचा समावेश आहे.

या यादीत असलेल्या नेत्यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा आणि पक्षाच्या मुद्यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. मीडिया विभागाचे प्रमुख हर्षल प्रधान यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना विनंती केलेली आहे की, त्यांनी या यादीत असलेल्या अधिकृत उमेदवारांकडून प्रतिक्रिया घ्याव्यात.

Leave a comment

0.0/5