Skip to content Skip to footer

मध्यस्थीसाठी आमच्याकडे येऊ नये, राऊतांचा भिडे गुरुजींना टोला

मध्यस्थीसाठी आमच्याकडे येऊ नये, राऊतांचा भिडे गुरुजींना टोला
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत मतभेद आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची चर्चा आहे. शिवसेना भाजपमधील मतभेद मिटवण्यासाठी दोनही पक्षातील नेते पुढाकार घेताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने संभाजी भिडे यांची भेट झाली नाही. संभाजी भिडे जवळपास २० मिनिटे मातोश्रीवर थांबले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर न परतल्याने त्या दोघांची भेट होऊ शकली नाही.

याविषयी संजय राउत यांनी भाष्य केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचा कथित आणि तथाकथित मध्यस्थांना निरोप आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीसाठी आमच्याकडे येऊ नये असं विधान केले आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यासह इतर अनेक मध्यस्थांना फटकारले आहे.

Leave a comment

0.0/5