Skip to content Skip to footer

भाजपा जिल्हाध्यक्षाला खाली खेचा आणि ठेचा – छत्रपती उदयनराजे भोसले

मुस्लिम समाजा बद्दल चुकीचे विधान भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले आहे. या विधाना बद्दल कराड मध्ये जाऊन उदयनराजे भोसले यांनी मुस्लीम समाजाची जाहीर माफी मागितली. पण जाताना त्यांनी “मी सॉरी म्हणायला आलेलो आहे, माझी तुम्हाला शपथ आहे असे जर पुन्हा कोणी केले तर त्याला खाली खेचा आणि ठेचा पण माझ्या वरती त्याचे गालबोट नको” असे उदयनराजे भर जाहीर सभेत म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष पावसकर यांनी मुस्लीम समाजाविरोधात चुकीचे विधान केले होते.

पावसकरांनी केलेल्या विधाना बद्दल खुद्द उदयनराजेंनी माफी मागितलेली आहे. परंतु सुचक सल्ला सुद्धा दिलेला आहे. तसे जर प्रचाराला आपण स्वतः असतो आणि हे विधान त्याने केले असते तर त्याला तिथच खाली स्वतः खेचले असते असे सुद्धा बोलून दाखविले. उदयनराजेंनी पराभवानंतर पुन्हा मतदार संघातील जनतेच्या भेटाघाटी घेण्याचे सूत्र चालू केलेले आहे. कराड येथील मुस्लीम समाजाच्या मेळाव्यात बोलताना उदयनराजे म्हणाले की, “माफी मागताना सुद्धा लाज वाटते. जे मी केले नाही, जे दुसऱ्यांनी केले त्या बद्दल मी माफी मागत आहे. त्याचा अर्थ एकच सर्व समाजाने एकत्र राहिले पाहिजे.

Leave a comment

0.0/5