Skip to content Skip to footer

आरे वृक्ष तोडीवर खा. अरविंद सावंत यांनी सरकारला घेतले फैलावर…

केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी बाकावर बसलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एका रात्रीत २७०० झाडांची कत्तल करण्यात आली आणि आपण चर्चा करतो प्रदूषणावर, वातावरण बदलावर.. सरकारकडे काही नियोजन आहे का?’ असा सवालही अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. लोकसभा नियम १९३ अंतर्गत विविध खासदारांनी जल प्रदूषण आणि वायू प्रदूषणावर चर्चा केली.

अरविंद सावंत म्हणाले, ‘मुंबईत एका रात्रीत २७०० झाडांची कत्तल करण्यात आली आणि आपण चर्चा करतो प्रदूषणावर, वातावरण बदलावर.. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याबाबत कधी विचार केला नाही. बॅटरीच्या गाड्या येत आहेत. हा कचरा कुठे फेकला जाईल याचा कधी विचार केला आहे का? सरकारकडे याबाबत काही नियोजन आहे का?’ पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना अरविंद सावंत यांनी हा प्रश्न विचारला.

Leave a comment

0.0/5