शिवसेनेचे मदत केंद्र सरकार मधिल दुवा – दिवाकर रावते

दिवाकर रावते | Link to Shiv Sena Aid Central Government

शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली मदत केंद्र ही शेतकरी आणि सरकारमधील दुवा ठरतील. यामाध्यमातून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना योग्य ती मदत करेल असा विश्वास शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना दिला.
राज्यात व मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सरकार नसतांना बळीराजावर ओढावलेल्या या संकटात त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शिवसेनेने ठिकठिकाणी मदत केंद्र सुरू करून केला आहे. गंगापूर तालुक्यातील अमंळनेर येथील शेतकरी मदत केंद्राला दिवाकर रावते यांनी आज भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांचा हातातोडांशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला असला तरी शिवसेना संकटाच्या काळी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे रावते यांनी यावेळी सांगितले. ही मदत केंद्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरू करण्यात आली आहेत. किंबहुना शेतकरी आणि शासनामधील एक महत्वाचा दुवा म्हणून ही मदत केंद्र काम करतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देईल असा शब्द देखील रावते यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here