Skip to content Skip to footer

काँग्रेसने घातलेल्या “धर्मनिरपेक्षते”च्या अटीवर राऊत म्हणतात की,

शिवसेना खासदार संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेचा धडाका दिल्लीतही सुरूच ठेवला आहे. काँग्रेसने धर्मनिरपेक्षते बाबत काही अटी घातल्याच्या प्रश्नाला राऊतांनी उत्तर दिलं आहे. देशाची राज्यघटनाच धर्मनिरपेक्ष या शब्दावर आधारलेली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेबाबत आम्हाला कुणी शिवकण्याची गरज नसल्याचे राऊतांनी म्हटलं आहे. उद्या मुंबईत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुंबईत बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितले

संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत सेल्युलर शब्दावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेस संजय राऊत म्हणाले, आम्ही संविधानाला मानतो. त्यातच सगळं आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की गीता-कुराणवर हात ठेवून शपथ का घेतली जाते? त्यापेक्षा संविधानाची शपथ घ्यायला पाहिजे महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असे सांगतानाच ‘उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी जनतेची इच्छा आहे’, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. दिल्लीत झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत सत्ता स्थापनेबाबत तब्बल तीन तास चर्चा झाली. या बैठकीनंतर राऊतांनी हे मत व्यक्त केले आहे.

Leave a comment

0.0/5