Skip to content Skip to footer

देवेंद्र फडणवीस यांनी माहिती लपवल्याप्रकरणी नागपूर खंडपीठाकडून नोटीस….

राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरुन चार दिवसांत पायउतार झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना आता आणखी एक झटका बसला आहे. नागपूर पोलिसांनी तेथील स्थानिक न्यायालयाकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावला आहे. निवडणुकीदरम्यान दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील दोन गुन्हेगारी खटल्यांची माहिती न दिल्याने हा समन्स बजावला आहे.

नागपुरातील सदर पोलिसांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावला आहे. सदर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक दरम्यानच्या शपथपत्रात दोन गुन्हेगारी खटल्यांचा उल्लेख न दिल्याने देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायालयाने समन्स बजावलं आहे. न्यायालयाकडून आलेला हा समन्स पोलिसांकडून फडणवीसांच्या घरी दिला आहे.

या प्रकरणात न्यायालयाने १ नोव्हेंबर रोजी एका याचिकेवर पुन्हा सुनावणी करण्यास सुरुवात केली होती. ज्यामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कथितपणे माहिती लपवल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. शहरातील वकील सतीश उके यांनी न्यायलयात याचिका दाखल करत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.

Leave a comment

0.0/5