Skip to content Skip to footer

मुंबईचा २०३० पर्यंत सर्वांगीण विकास करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही….

शहरातील विविध पायाभूत सुविधा, झोपडपट्टी मुक्त मुंबई करणे, मुंबई २०३० दृष्टिक्षेप यात शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर, पूर नियंत्रण आणि हवामान बदल, एमएमआरडीए आणि एसआरए मधील समन्वय प्रकरणे याबाबत सकारात्मक चर्चा करून नियोजनात्मक निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या महापालिकेतील बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरेंचे मिशन मुंबई 

मुंबईचे मुख्यमंत्री अशी ओळख उद्धव ठाकरे यांची झाली आहे. आता ते मुंबईसाठी खास मिशन आखत आहेत. काय आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मिशन मुंबई. या मिशन मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनी महापालिकेत चार तास बैठक घेतली. मुंबईबद्दल काय ठरवलंय उद्धव ठाकरेंनी? मुंबईचा २०३० पर्यंत सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेत तब्बल चार तास आढावा घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्हिजन २०३० चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुंबईत पर्यटनाला चालना देण्याबरोबर विविध पायभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. नव्या झोपड्यांवर नियंत्रण ठेवून परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर भर असणार आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील खड्डे यापुढे न दिसण्यासाठी खड्डे मुक्त रस्ते तर मुंबईकरांना २४ तास पाणी देण्यासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे

Leave a comment

0.0/5