Skip to content Skip to footer

पोलिसांना राष्ट्रपती पदक दिले पाहिजे, सेना खासदाराची मागणी

6 डिसेंबर रोजी सकाळी तीन वाजता तेलंगणा पोलिस आणि हैद्राबाद येथे घडलेल्या बलात्काराचे चारही आरोपी यांच्या झालेल्या चकमकीत हैदराबाद पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला या झालेल्या घटनेनंतर देशातील जनतेने तेलंगणा पोलिसांचे अभिनंदन केले तसे निर्भया यांच्या आईने सुद्धा १० दिवसात न्याय मिळाला म्हणून त्या पोलिसांचे आभार मानले.

शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी हैदराबाद चकमकीचे समर्थन केले असून पोलिसांचं अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांनी पोलिसांना राष्ट्रपती पदक दिलं पाहिजे अशी मागणी देखील केली. समाजासमोर अशी पद्धतीची उदहारणं उभी राहणे गरजेचं असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. तसंच चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली असून, त्यांच्या घरी असाच प्रकार झाला असता तर असे बोलले असते का ? अशी विचारणा केली आहे.

Leave a comment

0.0/5