Skip to content Skip to footer

गोपीनाथ गडावरील पंकजा-खडसे यांच्या भाषणावर तरुण भारत मुखपत्रातून जहरी टीका

गोपीनाथ गडावरील पंकजा-खडसे यांच्या भाषणावर तरुण भारत मुखपत्रातून जहरी टीका

गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमांत पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी केलेल्या भाषणात अहंकार दिसला असे म्हणता तरुण भारत या मुखपत्रातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या दोन्ही नेत्यावर ताशोरे ओढले आहे. तरुण भारत हे संगःची विचचारसरणी असणारे मुखपत्र आहे. या मुखपत्रातून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी गोपीन गडावर जे म्हंटले आहे ते राजकीय दृष्टया अयोग्य आहे. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या मुलीच्या पराभवाचे खापर पक्ष नेतृत्वावर म्हणजेच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील मोदी-शहावर खापर फोडले आहे.

रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या किंवा एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजप बहुजनांचा पक्ष झाला असता का? आता यापैकी काहीच नाही, तर तो एकदम ‘मूठभर’ लोकांचा झाला का? असा प्रश्न ‘तरुण भारत’मधून विचारण्यात आला आहे. अहंकारामुळे आपल्या पराभवाचं आत्मपरीक्षण करता येत नाही. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे अहंकारी झाले आहेत. गोपीनाथ गडावर दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या अयोग्य बोलले आहेत, असं म्हणत ‘लोकांच्या मनातला मुख्यमंत्री’ या पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावरही टीका करण्यात आली.

आपण कुणाला काय दिले, कुणासाठी काय काय केले, हे आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते, अगदी राजकारणातही. उलट, ते लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि आपण, पक्षाने मला किती दिले, याचीच सतत जाहीर उजळणी करायची असते. हा विधिनिषेध सर्वसामान्य कार्यकर्त्याने पाळला नाही तर एकवेळ चालून जाते. परंतु, जेव्हा आपण स्वत:ला .

‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’ असे नामाभिधान लावून घेतो किंवा ‘मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो’ असे आत्ममुग्ध विधान करतो, तेव्हा तर हा विधिनिषेध कटाक्षाने पाळायचा असतो. अगदी आजच्या प्रचलित भाषेत बोलायचे, तर या मेळाव्यात पंकजा मुंडे व नाथाभाऊ जे काही बोलले, ते ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ (राजकीयदृष्ट्या अयोग्य) असेच होते, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5