Skip to content Skip to footer

नव्या वर्षाच्या प्रारंभी खड्डे मुक्त अहमदनगर करण्याचा दृढ संकल्प : खासदार डॉ. सुजय विखे पाटील.

अहमदनगर शहरातील अहमदनगर – मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील बोल्हेगाव फाटाशिंगवे नाईक नगर, अहमदनगर शहरातील निलक्रांती चौक, अहमदनगर – पुणे बाह्यवळण रस्ता व इतर रस्ते दुरुस्तीची पाहणी खासदार डॉ. सुजय दादा विखे यांनी केली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विकास कामे तसेच दुरुस्तीच्या कामांना प्रत्यक्षपणे भेट देऊन कामांची चाचपणी त्यांनी केली.

ही विकासकामे जलदगतीने पूर्ण करून रस्ते, ड्रेनेज तसेच अन्य कामांमधून जनहित जपण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी होत असून, त्यामुळे समाधानी असल्याचे मत यावेळी त्यांनी मांडले. संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना ही त्यांनी याप्रसंगी केली.

नव्या वर्षात प्रदार्पण करताना सर्वांच्या साथीने अहमदनगर खड्डे मुक्त करण्याचा त्यांचा दृढ निश्चय सफल होत असून, त्यासाठी कठोर प्रयत्न करत राहू आणि जनतेला त्यांच्या सोई सुविधा मिळवून देऊ असा विश्वास ही त्यांनी दिला.

Leave a comment

0.0/5