Skip to content Skip to footer

खासदार जलील यांच्या तिरंगा यात्रेत आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

खासदार जलील यांच्या तिरंगा यात्रेत आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

संभाजीनगर मधील खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या माहिती अधिकारी कार्यकर्त्यावर रविवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. या रॅलीमध्ये आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप नदीम राणा यांनी केलेला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नदीम राणा यांनी काही दिवसापूर्वी खासदार जलील यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती.

एअर इंडियाची १७ मार्चला लागणार बोली

खासदार जलील यांनी धर्माच्या आधारावर निवडणूक लढवली होती असे आरोप राणा यांनी जलील यांच्यावर लावले होते. या विरोधात कोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती. याचा राग मनात ठेऊन खासदार जलील यांच्या कार्यकर्त्यांनी  त्यांच्यावर जिवघेणा हल्ला केला होता. प्रजासत्ताक दिनादिवशी जलील यांच्याकडून तिरंगा रॅली काढण्यात आली होती. तेव्हाच जलील यांच्या कार्यकर्त्यांनी राणा यांच्या गाडीवर हल्ला केला होता.

Leave a comment

0.0/5