Skip to content Skip to footer

मोदी राम तर शहा हनुमान, शिवराजसिंह चौहान

मोदी राम तर शहा हनुमान, शिवराजसिंह चौहान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री राम तर गृहमंत्री अमित शहा हनुमान आहेत असे वक्तव्य मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्ली येथील प्रचार सभेत केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला असून भाजपने आपले स्टार नेते प्रचारात उतरवले आहे. महाराष्ट्रतूनही देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे , पंकजा मुंढे असे महत्वाचे नेते दिल्लीत तळ ठोकून आहेत.

ठाकरे सरकार करणार मेगा भरती, भरणार ७०,००० सरकारी पदे

शिवराज चौहान यांनी आपल्या भाषणात सी.ए.ए. च समर्थन करत आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. तसेच सी.ए.ए कसे गरजेच आहे हेही उपस्थित नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपचा प्रचार राष्ट्रवाद, पाकिस्तान, सी.ए.ए च्या मुद्ध्याभोवतीच केंद्रित राहणार असल्याच पुन्हा अधिरेखीत झालं आहे.

Leave a comment

0.0/5