Skip to content Skip to footer

दिल्लीत बोलावून केला चंद्रकांत पाटील यांचा अपमान, रस्त्यावर जागोजागी वाटण्यास लावले प्रचार पत्रके

दिल्लीत बोलावून केला चंद्रकांत पाटील यांचा अपमान, रस्त्यावर जागोजागी वाटण्यास लावले प्रचार पत्रके

दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या भाजप नेत्यांचे एकेक रंगतदार किस्से समोर येऊ लागले आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही प्रचारासाठी दिल्लीत गेले असून ते कार्यकर्त्यांसोबत दिल्लीच्या गल्लीबोळात फिरून प्रचाराच्या चिठ्ठ्या वाटत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून भाजपवाले दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची अब्रू घालवत आहेत, अशी टीकाही होऊ लागली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील काही आघाडीचे भाजप नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराला गेले आहेत. विनोद तावडेंच्या प्रचारसभेला बोटावर मोजण्याइतकेच लोक उपस्थित असल्याची छायाचित्रे त्यांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवर टाऊन टीका ओढवून घेतली होती. एवढी तुफान गर्दीची सभा कधीच पाहिली नाही, पाय ठेवायलाही जागा नाही, असा त्या टिकेचा सूर होता. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची दोन छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत.

या छायाचित्रांत चंद्रकांत पाटील दिल्लीच्या गल्लीबोळात कार्यकर्त्यांसोबत फिरून प्रचाराच्या चिठ्ठ्या वाटत असल्याचे या छायाचित्रांत दिसत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांवरही टीका होत आहे. ‘ दिल्लीत प्रचाराला म्हणून बोलावलं अन् चिठ्ठ्या वाटायला लावल्या. भाजपवाले दिल्लीत महाराष्ट्राची अब्रू घालवत आहेत,’ अशी टीका एका नेटकऱ्याने केली आहे. तर मराठी म्हणून वाईट वाटले पण हीच त्यांची लायकी आहे, अशी बाणेदार टीका एका नेटकऱ्याने केली आहे.

Leave a comment

0.0/5