हे पुण्यातच होऊ शकतं! ‘जगातल्या सर्वात डेंजर मनुष्या’चं पत्र वाचाच

हे पुण्यातच होऊ शकतं! 'जगा-This can happen in Pune! Live

सोशल मीडियावर काही व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका कामवाल्या बाईचे व्हिजिटिंग कार्ड सातासमुद्रापार पोहोचलं होतं. पुणे तिथे काय उणे ही म्हण तर सर्वांनाच माहिती आहे. तिथल्या पुणेरी पाट्या तर प्रसिद्ध आहेतच. आता पुणे आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. बँकेला एका माणसाने लिहिलेल्या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

बँकेला कोणत्या कारणासाठी माणूस पत्र लिहू शकतो तर एखाद्या नोटीसीला उत्तर म्हणून किंवा काही अर्ज वगैरे करायचा असेल तर त्यासाठीच. पण इथं पत्र लिहिण्याचं कारण अजबच आहे. पत्रात उल्लेख केल्यानुसार संबंधित व्यक्तीने त्यांना काका म्हटल्याने बँकेला पत्र लिहिलं आहे.

पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे की, मॅनेजर साहेब, आपल्या बँकेतील लोक, कर्मचारी कसे आहेत ते मला पूर्वीपासून माहिती आहे. तरी माझे वय 43 असून आताच मी 22 वर्षाच्या मुली बरोबर लग्न केलं आहे. तरी मला काका म्हणून माझा अपमान करू नये. नाहीतर मी जेव्हा अपमान करेन तेव्हा बघा असा सज्जड दमच बँकेच्या मॅनेजरला दिला आहे.

पत्राचा शेवट करताना त्या व्यक्तीने नावही लिहिलं आहे. त्याखाली आपण जगातला सर्वात डेंजर मनुष्य असल्याचंही म्हटलं आहे. पुण्यातील जनता बँकेच्या मॅनेजरला हे पत्र लिहिण्यात आलं आहे. बँकेचा पूर्ण पत्ता त्यावर नमूद केला आहे. हे पत्र खरंच पाठवण्यात आलं आहे की हा एक खोडसाळपणा आहे याची माहिती मिळालेली नाही. मात्र या पत्राची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here