Skip to content Skip to footer

तुमच्याकडे शुद्ध करण्याची लॉंड्री आहे का ? – उद्धव ठाकरे

तुमच्याकडे शुद्ध करण्याची लॉंड्री आहे का ? – उद्धव ठाकरे

शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर युती करून आपली तत्व सोडली अशी टीका भाजपा कडून शिवसेनेवर होतच आहे. या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. “पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो? त्या पक्षातले मोठमोठे नेते भाजपात सामावून घेतलेच आहे ना. तुमच्याकडे शुद्ध करण्याची लॉण्ड्री आहे का?,” असा सवालच उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना विचारला आहे. सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची बेधडक उत्तरे दिली.

आज आपण सत्ता स्थापनेसाठी एकत्र आहात. याच्यावर भारतीय जनता पक्ष सातत्यानं टीका करतोय,” असा प्रश्न ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “ठीक आहे ना. करू द्या त्यांना टीका. पण मग माझा प्रश्न असा आहे, पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो? त्या पक्षातले मोठमोठे नेते घेऊन भारतीय जनता पक्षातसुद्धा त्यांना सामावून घेतलंच आहे ना. कित्येक नेते काँग्रेसमधून त्यांनी घेतलेत. त्यांना आमदारक्या, खासदारक्या किंवा इतर काही गोष्टीसुद्धा दिल्या आहेत. तेसुद्धा विचारधारेवरच होते ना?,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a comment

0.0/5