लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर भाजपाला सुखाचे दिवस आले होते. त्यामुळेच सत्तेच्या हव्यासापोटी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अनेक बडे नेते भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला होता. राधाकृष्ण-विखे पाटील, नाईक कुटुंब, कालिदास कोळंबकर, चित्र वाघ, हर्षवर्धन पाटील यांच्या सारख्या बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली होता. आता भाजपात गेलेले दोन्ही काँग्रेसचे नेते सत्ते विना व्याकुळ झाले आहेत. त्यामुळे आता लवकरच त्यातील काही नेते आपल्या जुन्या पक्षात पुन्हा प्रवेश करणार आहे.
त्यातच आता राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा आपल्या स्वगृही म्हणजेच लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे अशी माहिती समोर येत आहे. काहीच दिवसापूर्वी त्यांच्या नगर श्रीरामपूर येथील कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले होते. परंतु त्यांच्या कार्यलयाच्या बँनरवरून भाजपा नेत्यांचे फोटो आणि कमळ गायब झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नगर मध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. त्यातच आज सकाळी विखे पाटील यांनी आज सकाळी काँग्रेस नेत्या आणि महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.
या बैठकीचा तपशिल समोर आलेला नसला तरी नेमकं काय बोलणं झाले?, या बैठकीत नेमकं काय शिजले असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येणार असल्याचे संकेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीम यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते.