२४ तारखेपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सरकारकडून राज्याच्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्यात आली होती. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत राज्याच्या एकूण १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. आता दुसरी यादी येत्या २८ फेब्रुवारीला म्हणजेच उद्या जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण १५ हजार ३५८ शेतकऱयांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित केली आहे. शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी लिंक करून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी बँकेचे हेलपाटे मारायला लागू नयेत, अचूकता यावी हा टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्याचा उद्देश आहे. २८ फेब्रुवारी रोजी दुसरी यादी जाहीर करण्यात येईल. तसेच पहिल्या यादीमध्ये अद्याप तरी कुठलीही त्रुटी दिसली नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.