Skip to content Skip to footer

भारताच्या स्वतंत्र संग्रामात भाजपाचे आणि संघाचे काय योगदान ? – सामना

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल पुण्यतिथी पार पडली. विधानसभेत सावरकरांना गौरवण्याच्या मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा पक्षात वाद निर्माण झाला होता. दरम्यान भाजपाने सावरकर यांच्या विषयी बेगडे आणि खोटे प्रेम दाखवण्याचा आव आणत आहे, अशी टीका सामनातून भाजपावर करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ढाल करून भाजपा हे नवराष्ट्राचे राजकारण खेळत आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर पेच निर्माण होईल अशा भ्रमात भाजपा पक्ष राहत आहे.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवी संघावर सुद्धा सामानातून निशाणा साधण्यात आलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांचे मोठे योगदान होते यात शंका नाही. परंतु भाजपा आणि संघाचे स्वतंत्र संग्रामात काय योगदान असा प्रश्न सुद्धा अग्रलेखातुन उपस्थित करण्यात आलेला आहे. तसेच १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला हे सुद्धा संघाने मान्य केले नाही, अशा प्रकारची जोरदार टीका सामानातून करण्यात आलेली आहे. तसेच संघावर सरदार पटेल यांनी दोनवेळा बंदी घातली होती याची आठवण सुद्धा अग्रलेखात करून देण्यात आलेली आहे.

तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची ढाल करून भाजपा राजकारण खेळत आहे. या राजकारणाने शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असेल, तरी त्यांचा भ्रमनिरास होणार आहे. भाजपाने हे काही ढोंग केले आहे त्यावर नक्कीच चपकार बसेल. भाजपाचा वीर सावरकर यांच्या विषयी पुळका खोटारडा आहे. सावरकर हे भाजपासाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून त्यांच्यावर राजकारण करण्याचा विषय राहिला आहे असे अग्रलेखात म्हंटले आहे.

Leave a comment

0.0/5