Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राम जन्मभूमीसाठी १ कोटोची देणगी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राम जन्मभूमीसाठी १ कोटोची देणगी

             मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या सहपरिवारासह रामजन्म भूमी येथे रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. पुढे अयोध्येत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील पत्रकार समूहाशी त्यांनी मुक्त  संवाद साधला या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी पक्षाच्या ट्रस्टकडून १ कोटीची देणगी देण्याची घोषणा केलेली आहे. याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या मंदिर निर्माणासाठी “फुल न फुलाची पाकळी” म्हणून १ कोटीची रक्कम पक्षाच्या ट्रस्टकडून देण्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मी भाजपा पासून वेगळा झालो आहे. हिंदुत्वापासून नाही असे सुद्धा बोलून दाखविले.

              तसेच मंदिर निर्मितीनंतर येथे येणाऱ्या भक्तांची संख्या मोठया प्रमाणात असणार आहे. तसेच महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात राम भक्त अयोध्येला येणार आहेत. त्या येणाऱ्या भक्तांच्या राहण्याच्या सोयीसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारकडून काही जागेची मागणी करून तेथे “महाराष्ट्र भवन” बांधणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार राउळे शेवाळे, खासदार गजानन कीर्तिकर आदी शिवसेना नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5