Skip to content Skip to footer

जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे १०० दिवसात फाटले, पुन्हा सामानातून भाजपाला टोला

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या सहपरिवारासह अयोध्या येथे राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. त्या पूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिक हे अयोध्येत दाखल झालेले आहे. उत्तर प्रदेश शिवसेना कार्यकर्ते सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्येत दाखल होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात पुन्हा एकदा भाजपाला जोरदार टोला हणाला आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने राम राज्य सुरु झालेले आहे. हे सरकार १०० तसही चालणार नाही असे दवे “ऐंशी तास”वाले करत होते. त्यांना तसेच झुलवत ठेऊन या सरकारने १०० दिवस पूर्ण केले आहे.

काही सरकार फक्त दिवस ढकलतात किंवा मोजत बसतात. पंधरा दिवसांचा टप्पा पार केला तरी जाहिरातरुपाने उत्सव साजरा करतात. अशा जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे गेल्या शंभर दिवसात फाटलेच आहेत. त्या मुखवटेबाजांचे होळी करुन मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येस निघाले आहेत. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हा कोणत्याही मतलबाशिवाय आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अयोध्या नगरीच्या मनामनांत आहेत याचा अनुभव आम्ही अनेकदा घेतला आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे अयोध्येत जात आहेत ते त्याच एका श्रद्धेने. हातात सत्ता नव्हती तेव्हाही ते रामचरणी गेले. आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावरही ते अयोध्येत जात आहेत ते त्याच नम्र भावानेच”

अयोध्याचा राजा हा सर्वांचा आहे. आरएसएस नेते जोशी यांनी बोलून सुद्धा दाखविले आहे. “हिंदुत्व” ही एका पक्षाची मत्तेदारी नाही त्यामुळे राम लल्ला आणि अयोध्या सर्वांची आहे. तर काहीजण विरोधाचा कापूस पिंजत बसतात. त्या पिंजऱ्यातून न धागा बनतो न वस्त्र, अशा मांजरपाट्यांची पर्वा न करता अयोध्येत राम मंदिर उभे राहणार आहे. असे टोले विरोधकांना सामनातून लगावले आहे.

Leave a comment

0.0/5