Skip to content Skip to footer

जागतिक महिला दिनी उपशाखा प्रमुख स्वप्नील म्हात्रे यांच्या तर्फे महिला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

जागतिक महिला दिनी उपशाखा प्रमुख स्वप्नील म्हात्रे यांच्या तर्फे महिला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

                 ८ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. परंतु आज स्व:रक्षणाचे धडे  देणे सुद्धा आजच्या महिला पिढीला जिकिरीचे झालेले आहे. हीच संकल्पना घेऊन आज महिलांना स्वरक्षणाचे धडे देण्याचे काम पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सिने अभिनेता अक्षय कुमार यांच्या जोडीने महानगर पालिकेच्या शाळेत उपक्रम राबिवले जात आहे. तीच संकल्पना घेऊन उपशाखा प्रमुख स्वप्नील म्हात्रे यांनी सुद्धा आपल्या प्रभागात महिला दिनाचेच्या दिवशी  विभाग प्रमुख तथा आमदार संजय पोतनीस, आमदार मंगेश कुडाळकर आणि महिला विभाग संघटक संजना मुगणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली (फ्री वूमन सेल्फ डिफेन्स) कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

                आज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात शहरात वाढलेले दिसून येत आहे. आज महिला ह्या सुरक्षितपणे घराच्या बाहेर सुद्धा निघू शकत नाही. आज वर्तमान पत्राच्या प्रत्येक पानावर आपण महिला बलात्कार, अत्याचार आणि त्यांच्या शोषणाच्या बातम्या वाचत असतो. आज या शोषणाला बळी पडणाऱ्या महिलांना सबलीकरणचे धडे देणे जिकरीचे झालेले आहे. हाच उपक्रम उपशाखा प्रमुख १७० प्रभाग स्वप्नील म्हात्रे चुनाभट्टी येथे उद्या महिला दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंदिर पटांगण येथे सायंकाळी ६ : ०० वाजता राबिवणार आहे.

Leave a comment

0.0/5