महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची कोणाच्या बापामध्ये हिंमत नाही – संजय राऊत
मध्यप्रदेश घडलेल्या राजकीय घडामोडीं नंतर राजकीय उलथापालट झालेली दिसून आली होती. काल बहुमत सिद्ध करण्याच्या काही तासा आधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला होता. यावर मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत:हून राजीनामा दिला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिली आहे.
राऊत मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, कोणाच्याही बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. आमदारांची फोडाफोडी करणाऱ्या भाजप नेत्यांना राऊत यांनी चांगलाच फैलावर घेतले. मात्र, कोरोनासारखे संकट समोर असताना आमदारांची अशाप्रकारे फोडाफोडी करणे योग्य नाही, असे राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्रात असे काहीही घडणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.